which indians will be affected by Trumps decision on H-1B visa  
ग्लोबल

H-1B व्हिसाबाबत घेतलेल्या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीयांना? कसा? वाचा सविस्तर...

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. H-1B व्हिसावर 2020 च्या अखेरपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे अमेरिकेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो भारतीयांचा हिरमोड होणार आहे. ट्रम्प यांनी रविवारी याबाबतची घोषणा केली आहे. तसेच 24 जून पासून हा आदेश लागू होणार आहे. 

कोरोना महामारीने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या महामारीमुळे लाखो अमेरिकन नागरिकांनी आपला जॉब गमावला आहेत. त्यामुळे स्थानिकांना कामासाठी प्राधान्य देण्यात यावे यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव वाढत चालला होता. परिणामी ट्रम्प सरकारने H-1B व्हिसा घेऊ पाहणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश नाकारला आहे. H-1B व्हिसावर या वर्षाच्या शेवटापर्यंत बंदी असणार आहे. शिवाय हे निर्बंध पुन्हा वाढवण्याचे संकतही ट्रप्प यांनी दिले आहेत.  

1 ऑक्टोंबरपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी अमेरिकन सरकारकडून H-1B व्हिसा जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे कंपन्यांनी अर्ज दाखल करणे सुरु केले होते. मात्र, ट्रम्प यांच्या या  निर्णयामुळे कंपन्यांची चिंता वाढली आहे. कारण त्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 साठी अनेक कर्मचाऱ्यांना अमेरिकेत जाण्याची संधी दिली होती. याचा फटका अमेरिका आणि भारतीय कंपन्यांना बसणार आहे. अनेक भारतीय अमेरिकेत जाऊन काम करण्याचे स्वप्न पाहत असतात, अशांचा स्वप्नभंग होणार आहे. 

ब्राझील, अमेरिका, भारतात एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण 
H-1B व्हिसा दरवर्षी लॉटरी पद्धतीने दिला जातो. जवळपास 1 लाखांच्या आसपास H-1B व्हिसा अमेरिकेकडून परदेशी नागरिकांना दिले जातात. भारतातून मोठ्या प्रमाणात आयटी इंजिनीअर अमेरिकेत कामासाठी जात असतात. H-1B व्हिसाच्या एकूण कोट्यापैकी जवळपास 60 ते 70 टक्के भारतीय अमेरिकेत जात असतात. त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाचा सर्वात मोठा फटका भारतीयांना बसणार आहे. 

नेतृत्वाचा अभाव हेच मोठे संकट;‘डब्लूएचओ’च्या प्रमुखांचे जागतिक नेत्यांवर...
ज्यांच्याकडे अमेरिकेचा व्हॅलिड व्हिसा आहे अशांना या निर्णयाचा फटका बसणार नाही. ते बाहेरील देशात राहत असले तरी ते अमेरिकेत परत जाऊ शकतात.  H-2B व्हिसा मिळवू पाहणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.  प्रशिक्षणार्थी, इंटर, शिक्षक, समुपदेशक अशांना किमान यावर्षी तरी अमेरिकेत जाता येणार नाही. जे भारतीय नागरिक सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहेत अशांना याचा फटका बसणार नाही. तसेच अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्यांना त्यांच्या व्हिसाचे स्टेटसही बदलता येणार आहे. शिवाय अवलंबून असणाऱ्या व्यक्ती( पत्नी किंवा मुले) यांना अमेरिकेत प्रवेशासाठी बंदी उठण्याची वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT